लोकसत्ता टीम

अमरावती : येथील प्रस्‍तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोंडेश्‍वर परिसरातील वडद येथे उभारले जाणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्‍याला तसे अभिवचन दिल्‍याचा दावा बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला असताना भाजपमधूनच त्‍यांच्‍या भूमिकेला विरोध होऊ लागला आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ

भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, प्रताप अडसड, भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न तसेच अमरावती शहरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम उघडून केलेला पाठपुरावा यामुळे शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या महाविद्यालयाच्‍या रुग्‍णालयामुळे अमरावतीकर जनतेला आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. काही संधीसाधू राजकारणी ज्यांचा वैद्यकीय महाविद्यालय आणण्यामध्ये कवडीचेही योगदान नाही, ते मात्र स्वतःच्या जागेची किंमत वाढवण्यासाठी तसेच भाजपला याचे श्रेय मिळू नये, यासाठी प्रयत्‍न करीत आहेत, अशी टीका भाजपचे नेते व माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणा यांचे नाव न घेता केली आहे.

आणखी वाचा- नागपूर: अनिल देशमुख यांचे समर्थक नरखेड खरेदी विक्रीवर सभापती, उपसभापती

सामान्य जनतेला जागेच्या राजकारणाशी काही संबंध नाही त्यांना आरोग्याची सेवा उपलब्ध व्हावी एवढाच भावना आहे आणि म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित करत असताना रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सर्व दृष्टीने सोईचे होईल, तसेच पुढील उपचारासाठी मोठ्या शहरात न्यायचे असेल, तर लवकर त्या गावी पोहचता येईल अशी जागा शोधावी. जे संधीसाधू नेते वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून राजकारण करत असतील, त्यांनी वेळीच सावध व्हावे. सर्वांच्या उपयोगाची असलेली जागा शासनाने निश्चित करावी. अमरावतीकर जनता या संधीसाधू राजकारण करणाऱ्यांना ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी या पद्धतीचे राजकारण करू नये, असा सल्‍ला देखील तुषार भारतीय यांनी दिला आहे.