नागपूर : जिल्हा परिषद समोर भाजपकडून रस्ता रोको आंदोलन सोमवारी सकाळी करण्यात आले. कार्यकर्ते आज सकाळी सिव्हिल लाईन्स येथील जि. प. कार्यासमोर एकत्र आले आणि ठिय्या आंदोलन करत रस्त्यावर बसले. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदार यांचे छायाचित्र जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर छापल्यामुळे भाजप जि.प.सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्प फाडून त्याची सभागृहाबाहेर होळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सभागृहातील सदस्यांचा रोष व्यक्त करण्याचा हा सनदशीर मार्ग असताना त्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासण्यात आले. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होत आहे, हे निषेधार्ह आहे. म्हणून याचा निषेध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ आजनिषेध आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा…वर्धा : धक्कादायक! खोटे शिक्के तयार करून कोर्टालाच फसविले

प्रमुख मागण्या कोणत्या?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंगला काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना कडक शिक्षा व्हावी
  • न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी.