स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्त आणि समाज सुधारक होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहचायला पाहिजे होते. मात्र, आजही पोहचू शकले नाही. ही खंत व्यक्त करत समितीने त्यांचे कार्य व जीवन समाजापर्यंत पोहचण्यासाठी काम करावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने देण्यात येणारा स्वा. सावरकर गौरव पुरस्कार माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, शिरीष दामले, सागर मेघे, आमदार समीर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, सावरकर हे देशभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित होते. ते साहित्यिक आणि समाज सुधारक होते. त्यांचे जीवन समाजातील तळागळातील माणसांपर्यंत पोहचणे आवश्यत होते. मात्र, आजही ते पोहचू शकले नाही. सावरकरांचा विचार पोहचवण्याचे काम समाजातील शेवटच्या माणसापर्यंत समितीने केले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

शंकरनगरातील स्वा. सावरकरांचा पुतळा निर्माण कार्यासाठी जागा मिळवून देण्याचे काम दत्ता मेघे यांनी केले असून त्यात त्यांचे मोेठे योगदान आहे. दत्ता मेघे यांची तुलना ही महाभारतातील दानशूर कर्णासोबत करता येईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. शून्यातून विश्व निर्माण करत त्यांनी समाजातील प्रत्येकासाठी दरवाजे उघडे केले.त्यांनी अनेकांना वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात मदत केली. अनेकांच्या जीवनात त्यांनी आनंद निर्माण केला. अडचणीत असलेल्या लोकांना त्यांनी मदत केली असल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी दत्ता मेघे म्हणाले, आयुष्यात जे काही केले आहे ते समाजाप्रती कर्तव्य म्हणून केले आणि त्यात मला आनंद मिळतो. चंद्रकांत लाखे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुळकर्णी यांनी तर संचालन अनिल देव यांनी केले.

हेही वाचा : सर्वधर्मसमभाव ही हिंदुत्वाची आधारशिला ; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

दत्ता मेेघे यांनी समाजात सामाजिक सेवेत खूप काम केले. मात्र, काही लोक राजकारणात राहून केवळ सत्ताकारण करत असतात आणि समाजकारणाकडे दुर्लक्ष करतात. सत्ताकारण हे अनेकांचे ध्येय असते. दत्ता मेघे यांनी समाजातील तळागळातील लोकांसाठी काम करुन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला आहे. पैसे कमावणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेकांकडून पैसा निघत नाही. परंतु दत्ता मेघे आणि कुटुंबीयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला मदत केली असल्याचे गडकरी म्हणाले.