चंद्रशेखर बोबडे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्याने होणाऱ्या चौफेर टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना घराबाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा ‘कलंक’ वार उपयोगी पडल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. या टीकेमुळे आपोआपच लोकांचे लक्ष इतरत्र वळल्याने ही बाबही भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरली आहे. ठाकरेंच्या वक्तव्यानंतर निषेध करण्यासाठी कार्यकर्ते अनेक महिन्यांनंतर रस्त्यावर आले. बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या अनेक आघाडय़ांनी ठाकरेंचा विरोध व फडणवीस कसे नागपूर भूषण आहे हे सांगण्याची संधी साधली.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

एकूणच काय, तर अनेक दिवसांनंतर भाजप रस्त्यावर दिसली. पूर्वी हीच भाजप राज्यात मविआचे सरकार असताना ऊठसूट रस्त्यावर येत होती. करोनाकाळातसुद्धा आंदोलने करण्यात आली. एक वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पाडून भाजप पुन्हा सत्तेवर आली. आंदोलने थांबली, कार्यकर्तेही स्थिरावले. या सत्ताबदलाला भाजपने रणनीती म्हटले असले तरी तेव्हाही लोकांना ते आवडले नव्हते. त्या काळात विदर्भात झालेल्या विधान परिषदांच्या दोन निवडणुकांत भाजपचा पराभव करून लोकांनी राग व्यक्त केला होता. मूळ शिवसेना आपल्या सोबत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेलेली शिवसेना हिंदूविरोधी आहे, असे भाजपकडून कार्यकर्त्यांना सांगितले जात होते. शिवसेना फोडल्यावर एक वर्षांने भाजपने राष्ट्रवादीही फोडली.

 तेव्हा या युतीचे समर्थन करणे कार्यकर्त्यांना अवघड जाऊ लागले. चौफेर टीकेमुळे कार्यकर्ते गप्पगार झाले. कारण मागील दोन दशकांपासून पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलने करीत होते. या पक्षाचे नेते कसे भ्रष्ट आहेत हे सांगत होते. त्यामुळेच मुंबईत अजित पवार यांचा शपथविधी झाल्याच्या दिवसांपासून नागपुरात भाजपच्या वर्तुळात शांतता होती. रोज पत्रकारांशी बोलणाऱ्या बावनकुळे यांना यावर प्रतिक्रिया देताना जड जात होते. विकासाचा मुद्दा पुढे करीत होते. समाजमाध्यमांवर तर भाजपविरुद्ध टीकेची मोहीम सुरू झाली. याला उत्तर देऊ न शकणाऱ्या कार्यकर्त्यांनी मग शांत बसणे पसंत केले होते.

 नेमक्या याच काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना कलंक म्हटले व वातावरण बदलले. नागपुरात येऊन ठाकरे यांनी टीका केल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया भाजपमध्ये उमटणे स्वाभाविक होत्या. तशा त्या उमटल्या. कार्यकर्ते रस्त्यावर आले. ‘कलंक’ला प्रत्युत्तर ‘कलंकित करंटा’ने देण्यात आले. ठाकरेंचे फलक फाडण्यात आले. एकूण काय, तर यानिमित्ताने कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर आले. ठाकरे यांनी राजकारणात कोणती भाषा वापरायची याचे धडे देणाऱ्या भाजपची संस्कृतीही यानिमित्ताने उघड झाली. ठाकरेच कसे महाराष्ट्राला कलंक आहेत हे सांगण्यासाठी फडणवीस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रत्येक ओळीत कलंक शब्द आहे. बावनकुळे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत तब्बल ३० वेळा या शब्दाचा उच्चार केला. ‘तर जोडय़ाने मारू’ असा इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेशी बेइमानी करून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप