अकोला : भाजप लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील पक्ष आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. दुसऱ्याचे घर फोडून स्वत:चे घर सजवता येत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली.

अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये भाजपची खासदारकी सोडून आलो आहे. त्यामुळे भाजप कसा पक्ष आहे, याची पूर्ण जाणीव आहे. भाजपबद्दल नागरिकांमध्ये पहिल्यासारखी सहानुभूती राहिलेली नाही. भाजपबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्याचा प्रत्यय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसला दुसऱ्याच्या घरात झाकून पहायची सवय नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, याची मला कल्पना नाही. अजित पवार यांच्यासोबत नागपूरच्या सभेत एकत्र होतो. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते राष्ट्रवादी पक्षाला सोडून जाणार नाहीत, असे पटोले म्हणाले.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Badlapur, Vaman Mhatre, Shiv Sena, abuse allegations, Adarsh School, female journalist,
मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा >>> गडचिरोली : २३ गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

आज शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांना या गंभीर प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सत्तेसाठी काही पण करण्याची सत्तापिपासू व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाने लढा उभारला आहे. एकमेकांची घरफोडण्याचे काम भाजपने सुरू केले. ‘लोटस’ हा प्रेमाचा शब्द आहे. दुसऱ्याची घरे तोडणारा नाही. केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचे काम केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला.