लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
वर्धा: संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची विराट सभा झाली होती. त्याचा धसका भाजपने घेतला आहे. म्हणून नागपूरच्या वज्रमूठ सभेत आडवे येत आहे. सभा फोल ठरावी म्हणून त्यांचा आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. पण सभेसाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. ही सभा विक्रमी व यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे सोडून सत्ताधारी अयोध्येला जातात. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. प्राप्त अहवालावर कार्येवाही करून शेतकऱ्यांना त्वरित न्याय दिला पाहिजे. प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम महविकास आघाडी करीत आहे. नागपूरच्या सभेसाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी यावे,असे आवाहनही त्यांनी केले.
First published on: 13-04-2023 at 09:30 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is afraid for nagpur meeting after sambajinagar meeting pmd 64 mrj