वाशीम: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवित यश संपादन करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणी केली जात आहे.काही दिवसापूर्वी भाजप कडून खासगी संस्थेमार्फत लोकसभेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये शिंदे गटाच्या खासदारासाठी आगामी निवडणूक अडचणीची असल्याने उमेदवार बदलावा, अन्यथा भाजप निवडणूक लढवणार असल्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर झाल्याचे बोलल्या जात आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.
सहा पैकी चार विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा विजयी करण्यासाठी भाजप जीवाचे रान करीत असून मागील काही महिन्यांपासून लोकसभा मतदार संघात भाजप सक्रीय होऊन लोकसभा प्रमुख, लोकसभा समन्वयक देखील नेमले आहेत. त्याअनुषंगाने यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जनसंवाद यात्रा नुकतीच जिल्ह्यातून गेली.
हेही वाचा >>>बुलढाणा: येळगाव धरण ७५ टक्क्यांपर्यंत भरले, नागरिकांना दिलासा
या दरम्यान बावनकुळे यांनी पायी यात्रा काढून व्यापारी तथा नागरिकांशी संवाद साधला. वाशीम शहरातील काळे लॉन येथे माध्यमांना दूर ठेऊन भाजपच्या काही निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विजयाचा कानमंत्र दिला.थेट जनतेत जाऊन विजयासाठी जीवाचे रान करा व जिल्हा भाजपमय करा.असे आवाहन केले होते. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेचा विचार करता यवतमाळ, राळेगाव,वाशीम आणि कारंजा हे चार विधानसभा मतदार संघ भाजपकडे आहेत. तर दोन विधानसभा सहकारी पक्षातील असल्याने भाजप ची ताकत अधिक असल्याची भावना पक्षात आहे. त्यातच भाजप कडून एका खासगी संस्थे मार्फत लोकसभेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील शिंदे गटा विषयी नाराजीचा सूर असल्याने शिंदे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलावा अन्यथा भाजप कडून उमेदवार उभा केला जाईल. अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर झाल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा >>>सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष अन…
भाजप कडून संजय राठोड यांच्या नावाला पसंती
भाजप जवळील विश्वासू असलेल्या एका खासगी संस्थे मार्फत लोकसभेचे सर्वेक्षण करण्यात आले. यामधे आगामी निवडणूक शिंदे गटातील खासदाराना अडचणीची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने भाजप कडून शिंदे गटाशी उमेदवार बदलून मंत्री संजय राठोड यांना उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याची माहिती आहे.