नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर प्रथमच उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत याच्या चारचाकीने नागपुरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधीपक्ष विशेषत: शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप केला जात आहे. भाजपकडून अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मंगळवारी देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा…VIDEO : नागपूर ‘हिट अँड रन’चा थरार : सीसीटीव्ही आले समोर
काय म्हणाले फडणवीस
हिट अँन्ड रन घटनेचा पोलीस तपास करीत आहे. त्यांनी या घटने संदर्भातील सर्व तथ्य जमा केले आहे. त्याआधारे या घटनेची चौकशी होईल. मात्र विरोधी पक्षांकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपला लक्ष्य केले जात आहे. बावनकुळे यांना बदनाम केले जात आहे. ते चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा…हेलिकॉप्टर खरेदीसाठी सुट, सायकल खरेदी केली तर लूट जयंत पाटील म्हणतात,‘ गद्दारांना…’
देशमुख यांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, देशमुख यांचा सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार आल्यावर हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकला आणि गिरीश महाराजांना अटक करा असे म्हटले. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याचे सगळे पुरावे पोलीस अधीक्षक यांनी त्यावेळी दिले आहे. त्यांच्या नोंदी आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. कुठलीही चूक नसताना गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांची माफी मागितली पाहिजे.असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा…“आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…
रोहित पवार मोठ्या मनाचे
रोहीत पवार यांनी एका सर्वेक्षणाचा हवाला देत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ३७ जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. या बाबतीत फडणवीस म्हणाले, रोहित पवार यांचे किती मोठ मन आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. एकीकडे भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे विरोधकाकडून सांगितले जाते. तरी पवार यांनी भाजपला जास्त जागा दाखवल्या हे आमच्यासाठी मोठे आहे.
हे ही वाचा…संकेतच्या कारची मानकापूर चौकातही पोलो कारला धडक, तिघांनाही मारहाण ..
सरसंघचालकांचे वक्तव्य ऐकले नाही
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजाबाबत केलेल वक्तव्य मी ऐकले नाही. त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणार नाही असेही फडणवीस म्हणाले.