नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडक सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. परंतु २०१४ च्या तुलनेत काँग्रेस उमेदवाराने २०२४ मध्ये १५ टक्के अधिक मते मिळवली व भाजपचे मताधिक्य कमी केले. यामुळे विधानसभेची निवडणूक समोर असताना भाजपची चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु गडकरी यांनी २०१४ मधील निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री व काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभव केला. यावेळी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू

परंतु, तिन्ही निवडणुकीची आकडेवारी बघता नितीन गडकरी यांचे मताधिक्य कमी झाले आहे. २०१४च्या निवडणुकीत गडकरींना एकूण मतदानाच्या तुलनेत ५४.१७ टक्के तर काँग्रेस उमेदवार मुत्तेमवार यांना २७.९२ टक्के मतदान झाले होते. २०१९मध्ये गडकरींना एकूण मतदानाच्या तुलनेत आणखी जास्त म्हणजे ५५.६७ टक्के मतदान झाले तर पटोले यांना ३७.४५ टक्के मते मिळाली. आता २०२४च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला ४२.७२ टक्के मतदान झाले तर गडकरींना ५४.०८ टक्के मतदान झाले. मागील तीन निवडणुकांची आकडेवारी बघता नागपुरात काँग्रेस उमेदवाराची मते वाढत असून भाजपची घटत आहेत. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील स्थिती

वर्ष भाजपकाँग्रेस
२०१४५,८७,७६७ (५४.१७ टक्के) ३,०२,९१९ (२७.९२ टक्के)
२०१९ ६,६०,२२१ (५५.६७ टक्के)४,४४,२१२ (३७.४५ टक्के)
२०२४६,५५,०२७ (५४.०८ टक्के)५,१७,४२४ (४२.७२ टक्के)

आणखी वाचा-‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ, गुणांमध्ये प्रचंड वाढ! ‘चांगले गुण मिळवूनही दर्जेदार संस्थेत प्रवेश दुरापास्त

नागपुरात यंदा काँग्रेस नेते एकत्र

नागपूर शहर काँग्रेसमध्ये नेहमीच दुफळी राहिली आहे. त्यामुळे पक्ष कमकुवत होत गेला. मात्र, यावेळी ठाकरे यांच्या नावावर स्थानिक नेत्यांनी एकमत घडवून आणले आहे. हे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम एकमेकांविरुद्ध राजकारण करीत आले आहेत. परंतु, या निवडणुकीत सर्व नेते सातत्याने एकाच मंचावर दिसले. त्यामुळे त्यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र होते. त्याचा फायदा गडकरी यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्धी उमेदवारांविरुद्ध लढताना काँग्रेसला झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is worried about the increasing vote share of congress in nagpur mnb 82 mrj
Show comments