नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातून काटोल मतदारसंघात महिलांना फोन करून लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचारणा केली जात आहे. महायुती सरकारच्या योजनेचा राजकीय फायदा घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप भाजप नेते आशीष देशमुख यांनी केला आहे. ते आज येथे माध्यम प्रतिनिधी शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहीण योजनेया श्रेय घेण्याचा अनिल देशमुख यांचा प्रयत्न असल्याचा भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी २० लोकांचे कॉल सेन्टर सुरू केले. पण अनिल देशमुख हे सावत्र भाऊ हे महिलांना चांगले ठाऊक आहे असे, देशमुख म्हणाले

हे ही वाचा…बुलढाणा : राज्यपाल म्हणतात,‘शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी…’

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यलयाने आरोप फेटाळला आहे. त्यांना काही तरी विषय हवा म्हणून स्वतःच कपोलकल्पित विषय निवडतात आणि माध्यमाशी बोलतात, असा पलटवार अनिल देशमुख यांच्या कार्यालयाने केला आहे. दरम्यान यापूर्वी देशमुख यांनी “शिंदे सरकार निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करणार”, असा दावा केला होता. तसेच गोडे तेल आणि गॅस सिलिडरची किंमत एवढी वाढवण्यात आली की दीड हजार रुपये त्यात जात आहेत. एका हाताने दायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घायचा प्रकार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागात आहे, असा दावाही अनिल देशमुख यांच्या कार्यालयाने केला आहे.

हे ही वाचा…वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…

काय आहे योजना

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिली जात आहेत. या योजनेला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील सुमारे दीड कोटी कोटी पेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत या योजनेचे पैसे मिळाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish deshmukh alleged that anil deshmukh is trying to take credit for ladki bahin yojana rbt 74 sud 02