भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाारष्ट्र हदरुन गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोन आरोपींना अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या गुन्ह्यात तीन नाही चार आरोपी असून पोलीस एका आरोपीला लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूचक वक्तव्य भाजपा उपप्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे. भंडारा बलात्कार घटनेतील पीडितेची भेट घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी हे विधान केले आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अजूनही पीडितेच स्टेटमेंट घेतल नाही. पोलीस तीन आरोपी सांगत असेल तरी पीडितेने डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार चार आरोपी आहेत. एका आरोपीला लपवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राज्यात लवकरच जम्बो मंत्रिमंडळ
जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडतात त्यावेळी सत्तेवर असलेले सरकार त्या संदर्भात काय पावले उचलते ते महत्त्वाचे आहे. आघाडी सरकारच्या काळात डझनभर मंत्री होते मात्र त्यावेळी अशा घटनांबाबत कोणी बोलत नव्हते. त्या अडीच वर्षांच्या काळात हिंगणघाटमध्ये एका मुलीला जिवंत जाळण्यात आले. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तसे लिहूनही दिले होते. मात्र कारवाई झाली नाही. उद्या भाजपचे सरकार आले तरी सर्व बलात्कार बंद होतील, असे मी अजिबात म्हणत नाही. मात्र जेव्हा जेव्हा बलात्काराची गंभीर घटना घडते तेव्हा अस्तिवात असलेल्या सरकारने अशा घटनेची गंभीर दखल घेणे आवश्यक असते. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांशी आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधत निर्देश दिले आहेत. लवकरच राज्यात जम्बो मंत्रिमंडळ येईल. विद्यमान मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पूर असतानाच पूर बाधित क्षेत्रात पोहोचले. पूर ओसरल्यावर नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
पीडितेची भेट घेऊन विचारपूस
चित्रा वाघ यांनी डॉक्टरांशी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडितेवर एक शस्त्रक्रिया झाली असून आणखी एक मोठी शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. परंतु या त्रासामुळे तिला अन्न गिळताही येत नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. गरज भासल्यास पीडितेला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून तिच्यावरील सर्व उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही वाघ म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष कोर्ट
हिंगणघाटमध्येही बलात्कार झालेल्या पीडितेला न्याय मिळवून देण्यास आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिलं होतं. मात्र, ते त्यांनी पाळलं नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अश्या घटना घडल्यावर खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवू अस मुख्यमंत्री सांगत होते मात्र हे खोटं आहे. परंतु भाजपा सरकारच्या काळात लवरकच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेष कोर्ट कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासनही चित्रा वाघ यांनी दिले आहे.