नागपूर : नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत असून काही लोक नाराज आहेत, लोक समोर येऊन बोलत नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीला सर्वच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आमच्या जवळपास १७० जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पूर्व नागपूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या प्रचारार्थ रोहीत पवार नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर भाजपचा गड राहिला नाही. लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत. त्यांची राज्यात आणि त्यांच्या शहरातही दहशत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
अजित पवार खोटे बोलतात
आपल्या हातातून निवडणूक जात असल्यामुळे कोणताही पर्याय नसतो त्यामुळे अनेकदा खोटे बोलून वेळ मारुन न्यावी लागते तसे अजित पवार यांचे झाले आहे. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा त्यांचा केविलवाना त्यांचा प्रयत्न असावा, असे रोहीत पवार म्हणाले.
हेही वाचा :मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
लोक दबाव वाढल्यानेच …
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग सुरक्षा यंत्रणानी तपाली. त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या बॅगाही तपासा अशी मागणी सर्वस्तरातून होऊ लागली. त्यामुळेच सत्ता पक्षातील नेत्यांची बॅगची तपासणी निवडणूक आयुक्त तपासायला लागले आहे. ज्या लोकांनी बॅग तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिले ही चांगली गोष्ट आहे पण बॅग न चेक करणाऱ्यावर काय कारवाई केली ? ते पत्र समोर यायला हवे असेही पवार म्हणाले.
राज्यात पोलीस असताना मध्यप्रदेश पोलिसांना बॅग तपासणी करण्यासाठी कशाला आणले आहे .लोकांना दाखवण्यासाठीच का होईना, मात्र सत्तेतील लोकांची बॅग तपासणी होत आहे हे चांगली गोष्ट आहे असेही पवार म्हणाले.
शरद पवार मराठी माणसाचे प्रतिक
शरद पवार मराठी माणसाचे प्रतीक आहे. भाजपने महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार केला आहे. त्यामुळे आम्ही निश्चय केला. काही केले तरी महाविकास आघाडीचे सरकार आणायचे. राज्याला विकासाचे एक नंबरचे राज्य बनून दाखवायचे आहे.
हेही वाचा : “…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
न्यायालयाकडून अपेक्षा भंग
घडयाळ चिन्हाच्या बाबतीत सुनावणी झाली नाही. आम्ही अपेक्षा ठेवली नाही. उच्च न्यायालयाकडून आमची अपेक्षा खूप होती मात्र निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण लाबवण्यात आले. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. मात्र उशीर झाल्याने न्यायव्यवस्थेवर आम्ही काही प्रमाणात नाराज आहे. आम्ही निवडणूक तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर लढत आहे.