लाडकी बहिण योजना शिंदे – फडणवीस सरकारची सध्या लाडकी योजना असली तरी भाजपच्याच भगिनी आता मोठी ओवाळणी मागू लागल्या आहे. भाजप प्रदेश पदाधिकारी, वर्धा नगर परिषदेच्या माजी बांधकाम सभापती व पहिल्या महिला गटनेत्या तसेच तेली समाज नेत्या असा स्वतःचा परिचय देणाऱ्या मायाताई उमाटे म्हणतात की २०१४ पासून मी वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी दावेदाऱी पक्षाकडे करीत आहे.

जिल्ह्यातील चारपैकी एका विधानसभा मतदारसंघात भाजपने महिला उमेदवार द्यावा. भगिनीस उमेदवारी मिळावी म्हणून श्रीमती उमाटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंत भगिनी उमेदवारी पासून नेहमी वंचित असतात.आपल्या या लाडक्या बहिणींना ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद यापुरतेच सीमित ठेवल्या जाते.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Vitiligo , Vitiligo groom bride, white spot,
कोड, पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर मेळावा
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

हेही वाचा >>> महायुतीला धक्का देत ‘एकला चलोरे’चा नारा; महादेव जानकरांची २८८ मतदारसंघात…

महिला आरक्षण पुरतेच प्रतिनिधीत्व देत बोळवण  केल्या जाते. आमच्या आमदारकी, खासदारकी साठी बोलणारा कोणीच नाही.प्रत्येक जिल्ह्यातील एका मतदारसंघात बहिण उमेदवार असली पाहिजे. आमच्यात सत्तापालट करण्याची क्षमता आहे. आम्ही ५० टक्के महिला मतदार आहोत. म्हणून या बहिणी लाडक्या असतील तर उमेदवारी पण मिळावी. काँग्रेस तर्फे कुणबी उमेदवार असल्यास भाजपकडून प्रबळ तेली समाजाचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा, असे साकडे मायाताई उमाटे यांनी पक्षाकडे घातले आहे.

हेही वाचा >>> अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ३१ला सभा, काय बोलणार?

वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे असे भाजप आमदार आहेत. देवळीत काँग्रेसीचे रणजित कांबळे आहेत. माया उमाटे यांनी उमेदवारी देण्याची मागणी तर केली पण कोणता आमदार भाऊ जागा रिक्त करून देणार असा प्रश्न गंमतीने केल्या जातो. कुणबी – तेली असे समीकरण  आहेच. त्यात आता लाडकी बहिण पुढे सरसावली  आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला उमेदवार दिला पाहिजे, असे साकडे आहे. पण निवडणूक लढण्यासाठी बहिण, भाऊ, वडील, आई असे नाते पाहल्या जात नसून निवडून येण्याची क्षमता हाच मुख्य निकष असतो, असे एका ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले. भाजपच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी महिला आरक्षित जागेवरच पक्षातील महिलांना आजवर संधी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहिण हा निकष किती गांभीर्याने घेतल्या जातो, हे पुढेच दिसेल.

Story img Loader