भाजप नेते नितीन गडकरी हे नागपूरकर असले तरी राष्ट्रीय नेते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची सर्वच पातळीवर नोंद घेतली गेली. गृहशहर नागपूरवर त्यांचे विशेष प्रेम. त्यामुळेच अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम ते नागपूरकरांसाठी आयोजित करतात. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा त्यापैकीच एक. दरवर्षी होणारा हा महोत्सव ख-या अर्थाने नागपूरकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणारा आहे. देशातील नामवंत कलावंतांच्या कला बघण्याची संधी यानिमित्ताने मिळते. यंदा तो २ ते ११ डिसेंबर या दरम्यान होत आहे.त्यामुळे महोत्सवात सर्व सामान्य नागपूरकरांनी सहभागी व्हावे असा गडकरी यांचा प्रयत्न असतो. महोत्सवाची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रसिद्धसह इतरही माध्यमं वापरली जातात. मात्र सर्वाधिक परिणामकारक ठरले ते खुद्द नितीन गडकरी यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी सर्वसामान्य नागपूरकरांना केलेला फोन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> …अन् गजराजाने धारण केले रौद्र रूप; उपद्रवी ‘व्हीडिओ’प्रेमींची तंतरली

हेही वाचा >>> नागपूर: धवनकर प्रकरणात तज्ज्ञ समितीला डावलून दुसऱ्याच सदस्यांची समिती गठित!

तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता आणि अचानक फोनची रिंग वाजते. तुम्ही फोन घेता आणि समोरून आवाज येतो. “हॅलो, मी नितीन गडकरी बोलतोय. नमस्कार. नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, त्यात आपण नक्की सहभागी व्हा, धन्यवाद” काही समजायच्या आत हे संभाषण संपते. ते ध्वनीमुद्रित केलेले होते हे तोपर्यंत स्पष्ट झालेले असते. पण आपल्याला नितीन गडकरींचा फोन आला ही भावनाच सर्वसामान्य नागपूरकरांना सुखावणरी ठरते. तो या फोनची चर्चा बाहेर अनेक ठिकाणी करतो. अभिमानाने गडकरींचा फोन आल्याच सांगतो.त्याचवेळी इतरही जण त्यांनाही असाच फोन आल्याचे सांगतात. तेंव्हा हा जाहिरात फंडा असल्याचे स्पष्ट होते. तोपर्यंत खासदार महोत्सव लोकांपर्यंत पोहचलेला असतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader nitin gadkari nagpur special love nagpur news ysh