नागपूर : विलंबाने का होईना अखेर पालकमंत्री जाहीर झाले. पण वाद काही संपताना दिसत नाही. भाजप नेत्या व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते तर आनंदच झाला असता,अशी प्रतिक्रिया नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या “मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं, असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर अजुन आनंद झाला असता..”मला जालना येथील पालकमंत्री पद मिळालं. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. मला मिळालेली संधी अनुभव म्हणून मी घेत असते.. प्रत्येक वेळी तुम्हाला मनासारखं काम करायला मिळेल, असं नाही तर मी पूर्वी पाच वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केलं.
माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीड साठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे..आत्ता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार.. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहे ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे, पंकज मुंडे म्हणाल्या