नागपूर : भाजपा नेत्या सना खान हत्याकांडाचा मुख्य आरोपी अमित शाहू तपासात पोलिसांना सहकार्य करीत नसून वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत आहे. अमित वेळोवेळी वेगवेगळी माहिती देत असल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जबलपूरमधील कुख्यात दारु तस्कर अमित शाहू याच्यासह राकेश सिंह आणि जीतेंद्र गौड यांना नागपूर पोलिसांनी भाजपा नेत्या सना खान हत्याकांडात अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी अमित आणि राकेश यांना दुसऱ्यांदा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. २ ऑगस्टला अमितने प्रेयसी सना खान यांचा जबलपूरमधील फार्महाऊसमध्ये खून केला. सना यांचा मृतदेह हिरन नदीच्या पात्रात एका पुलावरून फेकला. मात्र, सना खान हत्याकांडाला १८ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही सना यांचा मृतदेह पोलिसांना सापडला नाही.
अमितने ज्या कारमध्ये सना यांचा मृतदेह टाकून नेला, ती कार पोलिसांनी जप्त केली. तसेच अमितच्या घरातून सना यांच्या कपड्याची बॅगही जप्त केली आहे. तीन दिवसांपूर्वी सिहोर परीसरातील एका विहिरीत आढळलेला एका तरुणीचा मृतदेह सना यांचा नसल्याचा दावा मेहरूनिसा खान यांनी केला आहे. त्यामुळे अमितने सना यांचा खून केल्यानंतर मृतदेह नदीत फेकला की अन्य कुठे पुरला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अमित पोलिसांना वारंवार वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्यामुळे पोलिसांच्या तपासातही अडचणी निर्माण होत आहेत.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा – एमपीएससीची ३० सप्‍टेंबरपासून ३३ संवर्गासाठी मुख्‍य परीक्षा, निकाल डिसेंबरमध्‍ये

हेही वाचा – नागपूर : प्रेयसी गर्भवती, प्रियकर म्हणतो ‘तो मी नव्हेच..’

आणखी एका आरोपीला अटक

सना खान यांचा खून केल्यानंतर अमितला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या धर्मेंद्र यादव याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Story img Loader