नागपूर : भाजपाच्या महिला नेत्या सना खान यांच्या अश्लील चित्रफिती तयार करून अनेकांकडून लाखोंची खंडणी घेणाऱ्या अमित साहूने सनाच्या मृतदेहाचे काय केले? याचा सुगावा लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी अमितच्या नार्को चाचणीच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतली आणि निकाल राखिव ठेवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेत्या सना खान यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना अनेकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाठविणाऱ्या तथाकथित प्रियकर अमित साहूसह सहाजणांना अटक करण्यात आली. त्याने सना यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाच्या अनेकांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्या होत्या. त्या चित्रफितीच्या आधारे लाखो रुपये खंडणी उकळली होती, असे तपासात समोर आले. त्यामुळेच पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सना यांचा मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली? याबाबत पोलिसांना आतापर्यंत उलगडा करता आला नाही. पोलीस कोठडीत असताना अमित साहूने मानकापूर पोलिसांची वारंवार दिशाभूल करीत गुंगारा दिला. मृतदेह न सापडल्याने आता सना खान हत्याकांड थंडबस्त्यात जाते की काय, अशी चर्चा होती. दरम्यान, पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी न्यायालयात अमित साहूची नार्को चाचणी करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज केला आहे. पोलीस आणि अमित यांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. त्यावर लवकरच न्यायालय निकाल देणार आहे.

हेही वाचा – ‘क्रीडा दंतचिकित्सा’मध्ये देशातील पहिला फेलोशिप अभ्यासक्रम नागपुरात, राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष

अमितला होणार पुन्हा अटक?

अमित साहू याच्यावर पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच खंडणीचाही गुन्हा मानकापूर पोलिसांनी नव्याने दाखल केला. सना खान हत्याकांडात पोलीस कोठडी संपल्यानंतर अमित आणि साथिदार कारागृहात बंद आहेत. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात अमितला प्रॉडक्शन वॉरंटवर पुन्हा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – रामदास आठवले म्हणतात, वंचितमधील कार्यकर्त्यांसह रिपब्लिकनच्या गटांना सोबत घेणार

सना यांचा सुपारी देऊन खून?

सना खान यांचा जनसंपर्क दांडगा होता. तसेच त्यांना अनेक भाजपा नेत्यांचा आशीर्वाद होता. परंतु, अमितकडे काही अश्लील चित्रफिती आणि छायाचित्र असल्यामुळे भाजपाचे अनेक नेते अडचणीत येणार होते. त्यामुळे सना खान यांचा सुपारी देऊन खून केल्याची चर्चा सध्या आहे. पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sana khan murder case police rush to court for amit sahu narco test adk 83 ssb
Show comments