नागपूर : “तुझ्या आईच्या कारचा अपघात झाला असून हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे ती जबलपूरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे”, अशा शब्दात सना खान यांची आई मेहरुनिसा यांनी सना यांचा १२ वर्षीय मुलगा अल्फास (बदललेले नाव) याची समजूत काढली. मात्र, त्याने आईला भेटण्याचा हट्ट धरला. त्यामुळे मेहरुनिसा यांनी कसेतरी धाडस एकवटवून ‘तुझ्या आईचा खून झाला…’ हे सत्य त्याला सांगितले. ते ऐकताच अल्फास हा निःशब्द झाला. आईच्या फोटोला छातीशी कवटाळून रडायला लागला. या प्रसंगाने उपस्थित नातेवाईकांच्याही अंगावर काटा उभा झाला.

भाजपा नेत्या सना खान यांना १२ वर्षीय मुलगा आहे. दीड वर्षांपूर्वी सना यांची फेसबुकच्या माध्यमातून अमित साहू (जबलपूर) याच्याशी ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. अमित हा कुख्यात गुंड असून त्याचा जबलपूरमधील दुहेरी हत्याकांडात सहभाग आहे. तो दारू, वाळू आणि गांजा तस्करी करायचा. अमितची पत्नी पोलीस दलात असल्यामुळे तो तिच्या पदाचा गैरवापर करीत होता. त्यातच त्याने सना खानला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याकडून ५० लाख रुपये घेऊन वाळू-गांजा तस्करीच्या व्यवसायात गुंतवले. विवाहित असतानाही त्याने सना खान यांच्याशी लग्न केले. २ ऑगस्टला त्या जबलपूरला गेल्या. २७ तोळ्याच्या सोनसाखळीवरून वाद झाल्याने अमितने सनाचा खून केला. या प्रकरणी अमित आणि जितेंद्र गौडला अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?

हेही वाचा – दिमाखदार कडी असलेला शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्‍य

हेही वाचा – रेल्‍वे मार्गावर घडणारी गुन्‍हेगारी नियंत्रणात; गेल्‍या वर्षीच्या तुलनेत घट

कुटुंबीयांचा प्रेमविवाहास विरोध होता

जानेवारीत अमित साहू हा सना खान यांच्या घरी आला. त्याने सना यांची आई मेहरुनिसा खान यांची भेट घेऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मेहरुनिसा यांनी प्रेमविवाह करण्यास थेट नकार दिला. मुलीचा मित्र आहेस, तर तेच नाते ठेव. मैत्रीला नात्यात बदलू नकोस, अशी तंबी दिली. परंतु, सना खान यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे.

Story img Loader