नागपूर:  राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी त्यांना भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट केल्यावर भाजपने देशमुखच भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, असा दावा केला. त्यामुळे कोणी कोणाला प्रस्ताव दिला याबबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सर्वप्रथम अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले अनिल देशमुख यांनी १९९५ मध्ये शिवसेना -भाजप युतीच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर ते दोन वेळा राष्ट्रवादी कडून विधानसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी पासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली ती कायम आहे. वेळोवेळी देशमुख यांनी या चर्चेचे खंडण केले होते. पण यावेळी भाजप नेत्यांनी देशमुखच पक्षात येण्यास इच्छुक होते,असा गौप्यस्फोट केला. भाजप नेते त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ २०१९ च्या निवडणुकीच्या काळातील एका घटनेकडे लक्ष वेधतात. 

maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Senior leaders are making urgent efforts to address insurgency in constituencies during assembly elections
बंडखोरांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ, गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
Katol Constituency Assembly Elections 2024 Anil Deshmukh and dummy candidates  Nagpur news
अनिल देशमुख आणि डमी उमेदवार, काटोलमध्ये ट्विस्ट
prathamesh parab and his wife kshitija celebrates diwali with disabled children
प्रथमेश परबने दिव्यांग मुलांसह साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी! त्याच्या पत्नीने लिहिली सुंदर पोस्ट; सर्वत्र होतंय कौतुक
lokjagar bacchu kadu and prakash ambedkar role in maharashtra assembly
लोकजागर : साटेलोट्यांचे ‘शिलेदार’!
vanchit Bahujan aghadi
परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध, जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात १९२ अर्ज पात्र

हेही वाचा >>> नक्षलग्रस्त भागातील चिमुकल्या ‘प्रिन्स’चा शिक्षणासाठी संघर्ष, शाळेत पोचण्यासाठी रोज सहा किमी जंगलातून पायपीट

२०१९ च्या विधानसभेच्या  निवडणुकीत अनिल देशमुख त्यांच्या काटोल विधानसभा  मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुका कार्यालयात हजारो समर्थकांसह  गेले होते. पण ऐनवेळी अर्ज न भरता  परत आले. होते. तेव्हाच देशमुख भाजपशी संपर्कात आहेत व त्यांना त्या पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अर्ज भरला नाही, ही चर्चा सुरू झाली. देशमुख समर्थकांनी त्याचे खंडन केले  होते. या निवडणुकीत देशमुखांनी भाजपचा पराभव केला. ते गृहमंत्री झाले. त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आता अडिच वर्षाने पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटले. त्यासाठी देशमुख यांचे वक्तव्य  कारणीभूत ठरले.

हेही वाचा >>> ‘हे’ सरकार हिंदूंना बरबाद करणारे; नाना पटोले म्हणाले कसबा पेठ, चिंचवडची पोटनिवडणुक…

“ माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी मान्य केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. , असे त्यावेळी सांगितले. त्यावर भाजपकडून तत्काळ प्रतिउत्तर देण्यात आले.  अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी दोनवेळा  प्रस्तावही दिले होते,  असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले. बावनकुळे यांचा संदर्भ २०१९ च्या अर्ज न भरता परतण्याच्या घटनेशी यातूनच जोडला जातो. त्यापूर्वी १९९५ मध्ये देशमुख हे सेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे देशमुखांसाठी भाजप नवीन नाही. मात्र त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून  दोन वेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र २०१४ मध्ये पराभूत झाले. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती.