वर्धा :आष्टी नगरपंचायत मध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळेच जनतेला मनस्ताप होत आहे, अशी टीका भाजप नेते सुमित वानखेडे यांनी केली आहे. या पंचायतकडे निधी उपलब्ध असूनही तो वितरित केल्या जात नाही.घरकुल निधी देणाऱ्या मुंबईच्या म्हाडास त्रुटींची पूर्तता करून दिल्या जात नाही. विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळू दिल्या जात नाही,अशी सत्ता काय कामाची असा सवाल वानखेडे यांनी केला.

आष्टी नगरपंचायतचा पहिल्या टप्प्यातील घरकुल लाभार्थ्यांचा रखडलेला हफ्ता खासदार रामदास तडस यांनी मिळवून दिला.त्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना ते बोलत होते. पंतप्रधान घरकुल साठी केंद्राकडून तीन हफ्त्यात राज्यास पैसे येतात.पहिल्या हफ्त्यातील सत्तर टक्के निधी खर्च झाल्याचा अहवाल जोवर केंद्रास दिल्या जात नाही तोपर्यंत दुसरा हफ्ता मिळत नाही.हे माहित असूनही तो निधी आष्टीत खर्च करण्यात आला नाही.मात्र निधी बँकेत ठेवून व्याज गोळा केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा >>>नागपूरमध्ये म्हाडा उभारणार ‘टेक्स्टाईल हब’

भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर तसेच अशोक विजयकर,नरेंद्र भानेरकर,सुरेश काळबांडे,अजय लेकुरवाळे,विजय खांडेकर,प्रज्वल चोहतकर यांनीही टीका केली.

Story img Loader