उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावे इतकी शिवसेना नेते संजय राऊत यांची उंची नाही आणि आता तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. पवार यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे. ते खोटे बोलून कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून मोठे झाले नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे सार माध्यमांशी  बोलताना व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपूर :ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्सना ताडोबातील वाघांचे आकर्षण; हेडन व मार्क या दोघांना जुनाबाईसह दोन शावकांचे दर्शन

देवेंद्र फडणवीस यांना मी गेली तीस वर्षापासून मी ओळखतो. असत्य बोलून कधीही ते राजकारण करत नाही.  फडणवीस जे बोलले आहे ते  जबाबदारीने बोलले. असे बावनकुळे म्हणाले. विरोधी पक्षातील मराठा ओबीसी नेत्यांच्या विरोधात तक्रारी आल्यावरच  कारवाई केली जात आहे.  त्यांनी चौकशीला सामोरे जावे. चुका करायच्या आणि पोलिसांकडून कारवाई झाली तर आकांडतांडव करायचे हे चुकीचे आहे. पोलीस नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई करणार नाही असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra chief chandrashekhar bawankule back devendra fadnavis over ajit pawar comment vmb 67 zws