नागपूर : सुजय विखे हे उमेदवार असल्यामुळे त्यांनी ईव्हीएम तपासण्याची मागणी केली आहे त्यांचा तो अधिकार आहे. ईव्हीएमबाबत जर कोणाला शंका वाटत असेल तर शंका निरसन करण्याचा अधिकार सर्वांना आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असो असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात वृत्त वाहिनीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला लोक कंटाळले आहे. अडीच वर्षात त्यांनी काय काम केले, कोणता विकास हे जनतेला सांगितले पाहिजे. केवळ टोमणे मारुन महाराष्ट्राचा विकास होणार नाही. खोट्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढली आणि विधानसभा सुद्धा खोट्या मुद्यावर लढतील , मात्र जनता आता त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा…ताडोबा व्याघ्रप्रकल्पात अतिविशिष्ट लोकांना सफारीदरम्यान भ्रमणध्वनी वापरण्याची मुभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी सकाळचे भोंगे न वाजवता शेतकरी शेतमजुरांच्या विकासासाठी काय केले आहे ते सांगावे. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करत जनतेची दिशाभूल केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे सांगण्यासारखे मुद्दे नाही, त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केवळ टोमणे मारण्याचे काम त्यांनी केले. केवळ टोमणे मारल्यने महाराष्ट्राचा विकास होत नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. संजय राऊत यांच्यावर टीका करत सकाळचे टोमणे हे विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. ते बंद करून महाराष्ट्राला आणि सरकारला त्यांनी मदत करावी असेही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत ते तपासले तर त्यांनी हिंदुत्व सोडले म्हणून मुस्लिम समाजाचे मत त्यांना मिळाले आहे. ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कोकण असो की मुंबई असो, कुठलाच माणूस हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. आम्ही काही मतदार संघात कमी पडलो आहे, मात्र त्याचे आत्मपरीक्षण करतो आहे. पण उद्धव ठाकरे तेही करत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा काम करीत आहे, ठाकरे अजूनही मातोश्रीच्या बाहेर पडत नाही अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा…वार्धक्यामुळे बँकेचे व्यवहार करू न शकणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा

महाविकास आघाडीकडे पाच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार झाले आहे. यांनी खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये महिना खोटे बोलून मतदान घेतले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला हातात घेऊन पंतप्रधान पदाचा कार्यकाळ तिसऱ्यांदा सुरू केला. संविधान बदलणारा असा या खोटारडा प्रचार केल्यामुळे महाविकास आघाडीला मत मिळाले आहे. महाविकास आघाडीने जनतेला माफी मागितली पाहिजे. रामटेकसह महाराष्ट्रात ३१ जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले. त्यांनी या ठिकाणी खटाखट साडेआठ हजार रुपये योजना सुरू करावी. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आता लोक रांगा लावतील. पण हा खोटेपणा जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

केंद्र सरकारचा मराठा आणि ओबीसीचे आरक्षण संदर्भात कुठलाही संबंध नाही. शरद पवार तुम्ही एवढे दिवस सत्तेत होता पण तुमची भूमिका मराठा आरक्षण विरोधात राहिली आहे. शरद पवार यांच्या सरकार मधील आदेश बघितले तर त्यांना त्यावेळेस जी सवलत देता आली असती ती दिली नाही. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. ते आता मात्र बोलत आहे. हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही. न्यायालयात लढले नाही, त्यांच्या काळात आरक्षण गेले. आता कुठल्या अधिकारात ते आरक्षणाबाबत बोंबा मारत आहे. भाजप आणि महायुतीने ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण दिले आणि आरक्षण हे महायुतीच्या काळात दिले जाईल असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…“मोदी विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केले, पण आम्‍ही…”, नवनीत राणा यांची खंत; म्हणाल्या…

सुजय विखे हे उमेदवार असल्यामुळे त्यांनी ईव्हीएम तपासण्याचा मागणी केली असून त्यांचा तो अधिकार आहे. ईव्हीएमबाबत जर कोणाला शंका वाटत असेल तर शंका निरसन करण्याचा अधिकार सर्वांना आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असो असेही बावनकुळे म्हणाले.
महिला बचत गटाकडून पोषण आहार बनवतात ते त्यांच्याकडे राहू द्यावे. यासाठी विदर्भातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधला असून त्यांनी महिला बचत गटाकडून काम काढणार नाही असे सांगत त्यांनी आश्वस्त केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra president chandrashekhar bawankule said everyone has the right to clear doubts about evm also criticizes uddhav thackeray vmb 67 psg
Show comments