नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न, महाराष्ट्रातील गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प, शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. सीमाप्रश्न आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी शिंदे आणि भाजपा सरकारला घेतलं होतं. त्यातच आज ( २८ नोव्हेंबर ) विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या जोरदार खडाजंगी झाली.

अभिजीत वंजारी यांनी लक्ष्यवेधी मांडताना गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांवरून भाजपाला टोला लगावला. “नुकत्याच गुजरातमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राचाही सहभाग होता. कारण, महाराष्ट्रातील उद्योग खाताच्या माध्यमाातून प्रकल्प पळवून गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळालं,” अशी टीका अभिजीत वंजारी यांनी केली.

हेही वाचा : अजित पवारांनी टीईटी घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “अब्दुल सत्तारांच्या मुलीला…”

तेव्हा आमदार प्रसाद लाड यांनी वंजारी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. यावर वंजारी चांगलेच संतप्त झाले. “तुम्ही नेहरुंबद्दल बोलू शकता. माझा अधिकार नाही का? आम्हाला बोलण्याची संधी द्या, ‘अरे हट’, ‘तुझ्यासारखे बरेच पाहिजे’,” असं अभिजीत वंजारी यांनी प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा : “…अशा बोलघेवड्या लोकांना तंबी द्या”, फडणवीस अमित शाहांना पाठवणार पत्र, म्हणाले “हे पूर्णपणे चुकीचे”

यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांना समज दिली. “प्रसाद लाड तुमची बोलण्याची पद्धत योग्य नाही आहे. सभागृहात मारामारी करायची आहे का?,” असा सवाल नीलम गोऱ्हेंनी उपस्थित केला.

Story img Loader