कार्यकर्त्याचे लग्न, वऱ्हाडी नृत्यात मग्न. मग काय, आमदार महोदयांनाही राहावले गेले नाही. त्यांनीही नवरदेवासोबत ठेका धरला. आमदारांना नाचताना पाहून वऱ्हाडीही अवाक् झाले. येथील राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आज एका कार्यकर्त्याच्या लग्नात नृत्य केले. आमदार बँडच्या तालावर भन्नाट नृत्य करत असल्याची व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा- “आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
राळेगाव शहराचे भाजपा उपाध्यक्ष शुभम मुके यांचा विवाह सोहळा आज, सोमवारी राळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. आमदार उईके यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यांनी लग्नाच्या वरातीत नवरदेवासोबत बँडच्या तालावर ठेका धरल्याने अनेकांना नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. वऱ्हाडी मंडळींनीही साथ देत आमदारांसोबत बँडच्या तालावर ठेका धरला.