नागपूर : भाजपचे नेते आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटी नितेश भांगडिया यांनी एका महिलेच्या घरात शिरून महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर विधानसभा संघाचे आमदार बंटी भांगडिया हे ११ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिमूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी त्यांच्यासोबत १० ते १५ कार्यकर्ते होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेने त्यांना घरात घुसण्याबाबत विचारणा केली. आमदार भांगडिया यांनी थेट बेडरुमध्ये जाऊन महिलेच्या पतीला मारहाण करणे सुरु केले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना महिलेच्या पतीला खेचत बाहेर आणले. महिलेने त्यांना प्रतिकार केला असता आ. भांगडिया यांनी महिलेचे केस पकडून बाहेर खेचले आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड केली असता आमदार भांगडिया यांनी महिलेला मारहाण केली. या ओढाताणीत महिलेच्या अंगातील कपडे फाटले. त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्ते आरोपी अमित जुमडे, लल्ला असावा, गोलू भरडकर, बब्बू खान, निखिल भूते, आशिष झिरे यांनी महिलेच्या पतीला मारहाण केली. या प्रकरणी महिलेने चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी आ. बंटी भांगडिया यांच्यासह १० ते १५ जणांवर विनयभंगासह अन्य गुन्हे दाखल केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla bunti bhangdia molestation case political circles crime adk 83 ysh
Show comments