वर्धा : भाजपाचे तसेच भाजपा सहयोगी आमदारांना तातडीचा संदेश आला आहे. पक्षाचे मुख्य प्रतोद आशिष शेलार यांनी पाठविलेल्या या संदेशात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वर्षा बंगल्यावर बोलावल्याचे नमूद आहे. ही तातडीची व महत्त्वाची बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांवर आता विशेष मदत कक्षाची नजर, रुग्णांची हेळसांड थांबणार

हेही वाचा – लोकजागर- सत्तालोलुप ‘समाजप्रेम’!

या बैठकीस मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार असून उपस्थिती अनिवार्य असल्याचे सूचित आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी यास दुजोरा दिला. मात्र अधिक भाष्य टाळले. मराठा आरक्षणाचा विषय सध्या ज्वलंत झाला आहे. सरकार कोंडीत सापडल्याचे म्हटल्या जाते. तसेच या प्रश्नावरून वातावरण हिंसक होत चालल्याने चिंतेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर सरकार विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलाविण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा होते. मात्र त्यावर जिल्ह्यातील एकाही आमदाराने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं या बैठकीत काय ठरणार यावर अवलंबून पुढे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होते.

Story img Loader