नागपूर: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने ७ नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केल्याने सरकारची डोकेदुखी ऐन दिवाळीत वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलनाबाबत संघटनेकडून एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे सूचना दिली गेली आहे. याबाबत सेवा शक्ती संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी म्हणाले, सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा, नोकरीची व वेतनाची हमी सरकारने घ्यावी, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमधील जाचक अटी रद्द करा, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, २०२१- २२ मधील संपकाळातील वेतन अदा करा, दिवाळी भेट द्या आणि इतरही एकूण १६ मागण्यांचे निवेदन सरकारसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नाही. शेवटी हक्कासाठी आंदोलन करावे लागणार आहे.

हेही वाचा – आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचे अखेर आदेश, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

हेही वाचा – नागपूर : हवाई सुंदरीवर हॉटेलमध्ये बलात्कार; ‘न्यूड फोटो’ प्रसारित…

मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित केले होते. परंतु आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसल्याने आंदोलन करणार आहे. या आंदोलनात संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर आणि मुख्य कार्याध्यक्ष व माजी मंत्री सदाशिव खोत उपस्थित राहणार असल्याचेही मेटकरी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar seva shakti sangharsh st karmachari sangh has announced a hunger strike from november 7 mnb 82 ssb