नागपूर : पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे हे नागपुरातील पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी नाही. नागपुरात भूखंड माफियाचे ‘हौसले बुलंद’ आहे, पोलीस त्यांच्यासोबत आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे. एक प्रकारे राज्याच्या गृहखात्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह केले आहे.

नागपुरात गु्न्हेगारी वाढल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून नेहमीच होत असतात. गृहमंत्र्यांचे गृहशहर असल्याने या आरोपांची चर्चाही होते. पोलिसांकडून त्याचा इन्कारही केला जातो. मात्र आता खुद्द सत्ताधारी भाजपच्याच आमदारांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. भूखंड माफियांनी सरकारी जागा विकण्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. या संदर्भात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी एक पत्रक मंगळवारी प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी पोलिसांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात “नुकतेच भूखंड विक्री संदर्भात बाबा ताजुद्दीन लॅन्ड डेव्हलपर्स विरुद्ध एफआयआर नोंदवल्याचे वृत्त प्रकाशित झाले.मौजा-तरोडी मध्ये महापालिकेची जागा अवैधरित्या डेव्हलपर विकत असल्याचे एनएमआरडीएच्या अधिक्षक अभियंत्यांनी ३० सप्टेबर २०२२ रोजी पत्र पाठवून महापालिकेला कळवले होते. मी सुद्धा १० ऑक्टोबर २०२२ व १७ ऑगस्ट २०२३ रोजी आयुक्तांना पत्र दिले होते व भूखंड माफियावर कारवाई करावी,अशी मागणी केली होती. परंतु महापालिकेच्या स्थावर विभागाचा अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केलेली नाही. या जागेच्या सातबारावर महापालिकेची नोंद आहे. आहे. मौजा तरोडी खुर्द खसरा नं. ५७ सिम्बायोसिसचा समोरची जागा आहे. महापालिकेचे अधिकारी निद्रेत असून भूखंड माफिया सरकारी भूखंड हडपत आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हेही वाचा >>>डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताने उपचार; गडचिरोलीतील मलेरियाग्रस्त वैद्यकीय अधिकार्‍याची अशीही रुग्णसेवा

भूखंड माफियावर मोका लावा.

नागपूरमध्ये भूखंड माफिया सरकारी जागा हडपने, एक भूखंड अनेकांना विकणे अशा प्रकारचा अनेक घटना शहरात घडत असून त्यातून गुन्हेगारी वाढू लाागली आहे. शहरात भूखंड माफियाचे ‘हौसले बुलंद’ आहे, पोलीस सुद्धा त्यांचा सोबत आहे. नागरिकांचा तक्रारी घेण्यात टाळाटाळ करतात. तक्रारदार भूखंड मालकांना अदाखलपत्र गुन्हा नोंदवल्याचे सांगू न परत पाठविण्यात येते. अनेकदा तक्रार सुद्धा घेत नाही. पूर्व नागपूर वाठोडा, पारडी, कळमना, नंदनवन या पोलिस स्टेशन अंतर्गत अशा प्रकारचा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अश्या भूखंड माफियाना मोका लावून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिस आयुक्तांनी या कडे स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार खोपडे यांनी या पत्रात केली आहे.