वर्धा : पक्षनेत्यांच्या राजकीय आयुष्यावर उठण्याचा प्रयत्न होतोय म्हणून काँग्रेसजन भाजपा विरोधात संतप्त झाले आहेत. त्यासाठी आंदोलनांचा धुरळा उडवून दिल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे हे भाजपाचे आमदार समीर कुणावार यांच्या संगतीत डावपेच लढत असल्याचे चित्र धक्कादायक म्हणावे तसे झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कुणावार, कांबळे व राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांनी एकत्र येत प्रचाराचा नारळ देवाच्या साक्षीने फोडला. दिल्लीत, मुंबईत जे झाले नाही ते हिंगणघाटला घडले. या नव्याच आघाडीचे शिल्पकार कुणावार, कांबळे, कोठारी यांचे एकत्र येणे यापेक्षा कांबळे यांचा समावेश चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘टायगर स्टेट’साठी दोन राज्यांत चुरस; मध्यप्रदेश की कर्नाटक?

हेही वाचा – सावधान! सायबर लुटारूंनी केलेय सेवानिवृत्‍त कर्मचाऱ्यांना लक्ष्‍य..

नागपूरच्या वज्रमूठ सभेसाठी पूर्वतयारी म्हणून कांबळे यांनीच काही दिवसांपूर्वी सभा घेवून मार्गदर्शन केले. किती लोकं आणणार म्हणून विचारणा केली. या सभेच्या तयारीवरून सुनील केदार व भाजपाचे कृष्णा खोपडे यांची जुंपल्याची ताजी घडामोड आहे. नागपूरचे दोन्ही पक्षाचे आमदार निष्ठेसाठी भांडतात. तर इथले भाजपा, काँग्रेस आमदार एकमेकांना सांभाळून घेत स्वतःची ताकद वाढवितात, हे कसे असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या निष्ठावंतांना पडला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla kunawar ranjit kamble and ncp sudhir kothari came together to start campaign for hinganghat bazar samiti election pmd 64 ssb