नागपूर : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेेने विविध मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरला एस संपाची हाक दिली होती. सरकारसोबत चर्चेनंतर दुपारीच आंदोलन स्थगित झाले. परंतु, आता ७ नोव्हेंबरच्या सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेवा शक्ती संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी म्हणाले, सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करा, नोकरीची व वेतनाची हमी सरकारने घ्यावी, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमधील जाचक अटी रद्द करा, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, २०२१- २२ मधील संपकाळातील वेतन अदा करा, दिवाळी भेट द्या आणि इतरही एकूण १६ मागण्यांचे निवेदन सरकारसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नाही. शेवटी हक्कासाठी आंदोलन करावे लागणार आहे. आंदोलनात संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर आणि मख्य कार्याध्यक्ष व माजी मंत्री सदाशिव खोत उपस्थित राहणार असल्याचेही मेटकरी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla organization protest tomorrow after gunaratna sadavarte