लोकसत्ता टीम
अकोला : अकोला पश्चिम मतदारसंघात हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होण्यासाठी शिवसेना उबाठाने रडीचा डाव टाकून छुप्या पद्धतीने उमेदवार उभा केला होता, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज येथे केला.
अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदी उपस्थित होते. तब्बल २९ वर्षे भाजपने अकोला पश्चिम मतदारसंघात अधिराज्य गाजवले. भाजपचे नेते, दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा सलग सहा वेळा येथून निवडून आले आहेत. भाजपला त्यांच्या गडात पराभूत करणे सहज शक्य नसल्याने शिवसेना उबाठा व काँग्रेसने मतविभाजनाचा डाव खेळला.
आणखी वाचा-बुलढाणा : ‘वंचित’ पाच मतदारसंघाच्या निकालात निर्णायक; पाऊण लाखांवर मतदान…
मविआमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने त्यांनी उमेदवार दिला. तरीही शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याने बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली. त्यावर शिवसेनेने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे या बंडखोरीला शिवसेना उबाठा गटाचे छुपे पाठबळ असल्याचे स्पष्ट होते. भाजपला अडचणीत आणण्यासाठी मविआने दोन उमेदवार दिले होते, असा आरोप आमदार सावरकर यांनी केला.
अकोला जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून मते महायुतीच्या पारड्यात टाकली. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, सिंचन कार्य, जिल्ह्यातील कोट्यवधींची विकास कामे, केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या विविध योजनांचा मोठा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा सकारात्मक परिणाम झाला. भाजपच्या यशात संघ परिवाराचे देखील अत्यंत मोलाचे योगदान आहे. आगामी काळात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास कार्य सुरू राहील, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
आणखी वाचा-‘एमपीएससी’कडून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होते का? २०२४ च्या किती परीक्षा प्रलंबित…
३८ हजारांवर बोगस मतदार
अकोला पश्चिम मतदारसंघात ३८ हजारावर बोगस मतदार आहेत. अनेक मतदारांचे यादीत दोन व तीन वेळा नाव होते. तालुका व गाव पातळीवर राहणाऱ्या नागरिकांचे नाव देखील अकोला पश्चिमच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत, असा आरोप अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी केला. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा दाखल केली. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. आगामी काळात त्या दृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. अनेक विद्यार्थी व नोकरदार मतदार बाहेर गावी राहत असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला, असे अग्रवाल यांनी सांगितले.
चुकीला माफी नाही
निवडणुकीमध्ये भाजप विरोधात बंडखोरी, पक्षविरोधी कृत्य करणाऱ्यांना आगामी काळात कुठल्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही. त्यांना पक्षात स्थान नाही, असे आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले. पक्षाने बंडखोरांवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.