नागपूर : पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही, अशी टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलतांना केली. भाजपने मंत्री केलेल्या पंकजा मुंडेंवर खुद्द पक्षाच्या आमदाराने गंभीर आरोप केल्याने नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप मध्येच वादाची ठिणगी पेटली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे.

Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Opposition boycotts MLAs oath taking ceremony in Assembly session Voting through EVMs alleged to have been rigged Print politics news
आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
people of Maharashtra raised doubts about voting through EVMs and role of Election Commission
ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली: अतुल लोंढे

हे ही वाचा… Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates : यंदाचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार

यासंदर्भात दर्शनी पक्ष्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा… अधिवेशन काळातील ‘त्या’ उधळपट्टीला आवर, खातेवाटप न झाल्याने अधिकारीही सुखावले

यावेळी त्यांनी बीडमध्ये सध्या सरपंच संजय देशमुख यांच्या निर्गुण हत्तेमुळे प्रचंड तणावाच वातावरण आहे. विरोधक या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप करीत आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनीही कणखर भूमिका घेतली असून, या हत्ये प्रकरणात विष्णू चाटे व त्याच्या टोळीचा मोरक्या कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी धस यांनी केली आहे.

Story img Loader