लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्धा : जिल्हा सहकारी बँका राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी समजल्या जाते. त्या आता मोडकळीस आल्याने या बँकांचे तारणहार समजल्या जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नागपूर अधिवेशनात बँकांच्या सक्षमकरणासाठी बैठका घेतल्या होत्या.

वर्धा बँकेत तर सहकार वरिष्ठांची खास सभा झाली. त्यानंतर सक्षमीकरण समिती स्थापन होत ठेवी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. भाजप नेते संदीप काळे यांनी आर्वी बाजार समितीतर्फे पाच लाख रुपयांच्या ठेवी प्रशासकाकडे सुपूर्द केल्या. आता तर भाजप आमदार डॉ. पंकज भोयर यांनी स्वतःची पाच रुपयाची ठेव सक्षमीकरण समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांची भेट घेवून दिली आहे. याची आता चर्चा होत आहे. कारण या बँकेवर ताबा राहलेले सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांचे व डॉ. भोयर यांचे कट्टर राजकीय वैर आहे. दोन्ही गट एकमेकांस पाण्यात पाहतात, इथपर्यंत हे वैर पोहचले आहे. मात्र ही बँक शेतकऱ्यांची असल्याने ती पूर्ववत सुरू करणे महत्वाचे, असे भोयर म्हणतात.

आणखी वाचा-नागपूर शहरात महिला सुरक्षा धोक्यात

दुसरीकडे पुढे निवडणूक झाल्यास नेहमीप्रमाणे बँक सहकार गटाकडे जाणार हे निश्चित. आज मात्र बँक सक्षम करणे हे पहिले उद्दिष्ट्य असल्याचे सर्वांचे एकमत आहे. सोलापूर जिल्हा बँकेची स्थिती बिकट झाली होती. त्यातून ती बाहेर पडली. सुरळीत झाली. तोच सोलापूर पॅटर्न राबविण्याची सूचना भोयर यांनी केली. तसेच होम ट्रेड कंपनी व सरकारकडून प्राप्त रकमेतून खातेदारांची रक्कम परत करण्याची सूचना केली. बुलढाणा जिल्हा बँकेप्रमाणे वर्धा जिल्हा बँकेस आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून राज्य शिखर बँकेला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सहकार सहसचिव संतोष पाटील यांनी सांगितले. या बँकेत१ लाख ४२ हजार खातेदारांची ३४० कोटी रुपयांची तसेच पतसंस्थांची रक्कम थकीत आहे. त्यासाठी चारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे द्या, असे सुचविण्यात आले. बँकेची आर्थिक घडी नीट बसावी यासाठी चाललेली धडपड खातेदारांना दिलासा देणारी ठरत आहे.