प्रशांत देशमुख
वर्धा : तेलंगणा विधानसभेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील २७ आमदारांवर निवडणूकीची जबाबदारी टाकली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार राज्याच्या प्रदेश समितीने ही निवड केली आहे. २०२३ मध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगना व मिझोराम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होवू घातल्या आहे. या प्रदेशात वेगवेगळ्या संघटनात्मक व जनसंपर्क कार्यक्रमाच्या हेतूने विविध १८ राज्यांतील ज्येष्ठ आमदारांची नियूक्ती करण्यात आली आहे. हे निवडलेले आमदार २० ते २७ ऑगस्टदरम्यान त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघातील विविध भागात प्रवास करतील.
या सर्व आमदारांवर सहा पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय समिती देखरेख ठेवेल. महाराष्ट्रातून निवडलेल्या आमदारांचे प्रशिक्षण प्रदेश कार्यालयात होणार आहे. या नंतर हे आमदार ठरलेल्या विधान सभा क्षेत्रात रवाना होतील. महाराष्ट्रातून निवडलेले २७ आमदार व त्यांचे तेलंगणातील मतदारसंघ याप्रमाणे आहेत.आमदार समीर कुणावार – एल.बी.नगर, डॉ.पंकज भोयर – गजवेल, संजीव रेड्डी – आरमूर, अशोक उईके – मेडचल, मदन येरावार – कोरातला, डॉ.संदीप धुर्वे – असीफाबाद, नामदेव ससाने – जुक्कल, कृष्णा गजभे – बोथ, डॉ.देवराव होळी – अदिलाबाद, किर्तीकुमार भांगडीया – दोरणाकल, राजेश पवार – सिरपूर, डॉ.तुषार राठोड – खानापूर, मेघना साकोरे – मुधोळे, प्रशांत बम – मालकपेटा, संभाजी निलंगेकर – छेन्नुर, अभिमन्यू पवार – मंचेरीयल, राणा जगजितसिंह पाटील – रामागुंडम, सुनील राणे – कुथबुल्लापूर, अमित साटम – कुकटपल्ली, ॲड.पराग अळवणी – सिकंदराबाद, ॲड.आशिष शेलार – पटानछेरवू, विजय देशमुख – बेलामपल्ली, सुभाष देशमुख – डुब्बाका, सचिन कल्ल्यानशेट्टी – कामारेड्डी, समाधान आवताडे – बोधन, निलय नाईक – हुजुरनगर, रमेश कराड – कोदाडा.