लोकसत्ता टीम

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या दालनात भाजपचे आमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यापीठातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कुठलीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात आहे. कुलगुरूंच्या दालनातच असे आंदोलन सुरू असल्याने नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
ubt leader aditya thackeray in loksatta loksamvad event for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका

नागपूर विद्यापीठामध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी काम करतात. ४० कर्मचाऱ्यांना कुठल्याही सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. तसेच त्यांना वेतनही कमी दिले जाते. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे कुलगुरू चौधरी हे विद्यापीठ शिक्षण मंचाच्या म्हणजे भाजप परिवाराच्या जवळचे आहेत. असे असतानाही त्यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.