Maharashtra Assembly Election 2024 NCP Anil Deshmukh Attack सोमवारी नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून यासाठी सरकारला जबाबदार धरण्यात येत आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलं असताना आता भाजपाचे नेते परिणय फुकेंनी ही घटना अनिल देशमुखांनीच घडवून आणल्याचा आरोप केला आहे. परिणय फुके यांनी समाज माध्यमावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले परिणय फुके?

अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. खरं तर मी माझ्या अनेक सभांमधून अशाप्रकारची खोटी घटना घडवून आणली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. आज तेच घडलं आहे. तुम्ही जर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो बघितले तर १० किलोचा दगड त्यांच्या गाडीत पडलेला दिसतो आहे. पण इतका वजनी दगड कुणी १० फुटाच्या अंतरावरून मारू शकत नाही. दगडफेकीसाठी साधारण कोणत्या प्रकारचे दगड वापरले जातात, हे सर्वांना माहिती आहे, असं ते म्हणाले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
drunken security guard assaulted three passengers on Dombivli Nahoor local threatening them
लोकलमध्ये डोंबिवलीतील प्रवाशांना, मद्यधुंद खासगी सुरक्षकाची दमदाटी
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

पुढे बोलताना, अनिल देशमुखांच्या गाडीच्या बोनेटवरसुद्धा दगड पडलेला दिसतो आहे, मात्र, त्यावर कुठेही निशान दिसत नाही. गाडीच्या काचांनीही मोठ्या भेगा दिसत आहेत. यासगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. यासंदर्भातील तपास होणं आवश्यक आहे. ही घटना म्हणजे अनिल देशमुखांनी केलेलं नाटक आहे. ते काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या २५ वर्षांपासून ते आमदार होते. मात्र, त्यांनी कोणतीही विकासकामं केलेली नाही. त्यांनी आता त्यांच्या मुलाला निवडणुकीत उतरवलं आहे. तो जिंकून येऊन शकत नाही, हे लक्षात आल्याने अनिल देशमुख हे सगळं नाटक रचवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही परिणय फुके यांनी केला आहे.

सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला

दरम्यान, सोमवारी रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. या घटनेनंतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावले असून मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला आहे. आताच काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू. अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

Story img Loader