नागपूर: उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार डोळा मारतात. ठाकरे यांचा एवढा अपमान झाला मात्र शिवसैनिकाना काहीच वाटले नाही. मी पण शिवसैनिक होतो पण असा अपमान बाळासाहेब असताना कधी झाला नाही अशी टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
देशात आता डोळा मारणारे दोन झाले आहे. एक म्हणजे अजित दादा आणि दुसरे राहुल गांधी असेही बोंडे म्हणाले. विरोधकांना सुदधा या अर्थसंकल्पा बाबत चांगले बोलावे लागत आहे. उध्दव ठाकरे बोलत असताना अजितदादांना डोळा मारावा लागला हे वाईट आहे आणि शिवसैनिकांना काहीच वाटले नाही. अजित पवार शेतकऱ्यांना ६ हजार देणार असल्यावर म्हणाले की घरात ४ लोक असतील तर त्याची रोजी ३ रुपये होणार आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का? त्यांचे सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी तरी दिली का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>> नागपूर : भाजपचे आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
कोरोना आणि महाविकास आघाडी चा काळ महाराष्ट्राला सुस्त करून टाकणारा होता. मात्र आता अर्थमंत्री फडणवीस यांनी मांडलेला अर्थ संकल्प सगळ्यांना सुख देणारा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांना विरोधात सुद्धा बोलता येत नाही म्हणून ते आता म्हणतात शेतकऱ्याचे वीज बिल वाढणार मात्र तसे काही नाही. आता सोलर ऊर्जा वाढविली जात आहे.