नागपूर: नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय मेळावा आज सोमवारी दुपारी होत आहे. त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार होते. मात्र सकाळीच ते येणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजयुमोचा मेळावा जाहीर झाल्यापासून तो वादात सापडला आहे.
विद्यापीठाच्या मैदानावर हा मेळावा होणार असून ते मैदान राजकीय कार्यक्रमासाठी देण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. आता अधिवेशनाला येणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दौरा रद्द झाला आहे. या मेळाव्याला देशभरातून कार्यकर्ते येणार आहेत.
हेही वाचा…video : ताडोबा महोत्सवात दोन वाघांची मारुतीला प्रदक्षिणा
नड्डा यांचा दौरा कां रद्द झाला?
भाजयुमोचा राष्ट्रीय मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार होते. पण दिल्लीत पक्षाच्या सांसदीय मंडळाची बैठक आज असल्याने नड्डा यांनी त्यांचा नागपूर दौरा रद्द केला. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा…आता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘हा’ मोठा बदल
मेळाव्याची जय्यत तयारी
मेळाव्याची तयारी जोरात करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पक्षाचे झेंडे लावण्यात आले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार असल्याने या निमित्ताने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जाणार आहे.