नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूरच्या महाल परिसरात प्रशस्त कार्यालय उभे केले जाणार आहे. ऑफिसची जागा ३८,००० चौरस फूट, २ बेसमेंट पार्किंग, ५०० लोकांसाठी बसण्याची क्षमता, कामगारांच्या प्रशिक्षणासाठी सुविधांनी सुसज्ज २ हॉल असेल. टेरेसवर बैठकीची व्यवस्था राहणार आहे. या कार्यालयासाठी पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठी मदत करण्याची घोषणा केली आहे. गडकरी यावेळी नेमके काय म्हणाले बघूया.

रविवारी भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावरील यावेळी बोलताना गडकरी यांनी भाजपा कार्यालयाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, कार्यालय बांधण्यासाठी अनेक अडचणी आल्या. किरायदारांकडून कशा पद्धतीने घर खाली करावी लागली याचा इतिहासही त्यांनी यावेळी सांगितला. पक्षाच्या आदेशानुसार भाजपा कार्यालयासाठी आपण २५ लाख रुपयांची मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ली लोक धनादेश देणे टाळतात. भाजपा आता हा सुरुवातीचा पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे कॅश देण्यावर लोकांचा अधिक भर असतो. परंतु आपली पक्षावर निष्ठा असते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या कमाईतून प्रामाणिकपणे आपण धनादेशाद्वारेच पैसे द्यावे असे आवाहनही गडकरींनी आवडी केले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पक्ष कार्यालयाच्या बांधकामासाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन म्हणजे स्वतःचं घर बनना इतका आनंदाचा क्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले. अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर कार्यालय उभे होत आहे याचाही आनंद व्यक्त केला.