नागपूर :भाजपचे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेले आंदोलन व बावनकुळेंच्या इशाऱ्यानंतर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी दुपारी व्हरायटी चौकात माजी खासदार प्रकाश जाधव व जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात भाजप विरुद्ध आंदोलन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेला फलक फाडण्यात आला. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपकडून होत असलेल्या राजकारणाने राज्याला कलंक लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलने, प्रेतयात्रा असे प्रकार करण्यात आले तर त्याला जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. यावेळी यावेळी पोलिसांशी वादावादी करताना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp politics tarnish maharashtra thackeray group agitation in nagpur news vmb 67 amy