नागपूर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यामुळे काँग्रेस नेत्याच्या डोक्यात यश गेले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला किंमत फारशी राहिलेली नाही. त्यामुळे जनतेला कळून चुकले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मस्ती टिकणार नाही अशी टीका माजी मंत्री व खासदार अनिल बोंडे यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयात जिल्हा भाजपची बैठक झाल्यानंतर खासदार अनिल बोंडे प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाय धुवून घेतले. चंद्रपूरच्या खासदार धानोरकर यांच्या भावाने शिवीगाळ केली. अमरावतीतमधील माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तर कळस केला. त्यांनी खासदार कार्यालयाचे कुलूप तोडले आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करत जनतेची दिशाभूल केली आहे. राहुल गांधी देशाचे नेतृत्व काय ते विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. देशातील जनतेचा आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात यश गेले असताना विधानसभेत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे बोंडे म्हणाले.
हेही वाचा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पोलिसाने केली आत्महत्या
रामटेक लोकसभा मतदार संघात ७५ हजार मताने राजू पारवे यांचा पराभव झाला. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली आहे. मात्र खोट्या प्रचारामुळे काँग्रेस त्या ठिकाणी विजयी झाली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. मतदार यादीत नावे गहाळ होती. त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करून घेतली जाणार आहे. शेतकरी, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी विविध शासकीय योजना असून त्या लोकापर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने काम केल जाणार आहे.
अमरावतीमधील सरकारी कार्यालय खासदार बळवंत वानखडे यांना निवडून आल्यावर ते मागासवर्गीय खासदार आहे असे सांगत यशोमती ठाकूर यांनी पत्र दिले आहे. आजच्या आजच द्या अशी मागणी केली. लोकप्रतिनिधी निवडणून आल्यावर लगेच कार्यलाय किंवा बंगला मिळत नसतो नसते मात्र ठाकूर यांना घाई झाली आहे. २०२२ मध्ये मी राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्यावर माझे कर्मचारी तिथे बसून निवेदन स्वीकारत होते.
हेही वाचा : ‘चिखलफेक’ महागात! काँग्रेस जिल्हाध्यक्षासह सत्तावीस पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे
बळवंत वानखडे खासदार असतांना एका हाताने ओढून अपमानास्पद वागणूक यशोमती ठाकूर यांनी दिली. त्यांना खासदाराला टेबलावर बसवले. हा अपमान केवळ बळवंत वानखडे याचा नसून मागासवर्गीय खासदार आणि जनतेचा अपमान असल्याचे बोंडे म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी विजयी मिरवणुकीत विभत्स हातवारे केले, ही मस्ती कुठून आली, ही मस्ती जनता उतवरणार आहे. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसचा विरोध करण्यासाठी सक्षम असल्याचे बोंडे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते.