बुलढाणा: बुलढाणा मतदारसंघातील महायुतीतील नाराजी व मनधरणी नाट्याला आज कमालीचा वेग आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपा बंडखोर विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला तर आज भाजपा संकटमोचक गिरीश महाजन बुलढाण्यात दाखल झाले. दुसरीकडे ‘टीम बंडखोर’ नागपुरात दाखल झाली आहे. यामुळे या वेगवान घडामोडींचा काय ‘निकाल’ लागतो याकडे जिल्ह्यातील महायुती प्रामुख्याने शिंदेंसेनेचे लक्ष लागले आहे.

बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. छाननी मध्ये त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला मात्र अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम राहिला. स्थानिक पातळीवरील नेत्यानी केलेले मनधरणी चे प्रयत्न फोल ठरले. एवढेच नव्हे तर शेगाव येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला. एवढेच नव्हे तर खासदार जाधवांचे गृहक्षेत्र असलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथून त्यांनी काल शनिवार पासून प्रचाराला दणक्यात सुरुवात केली.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Eknath Shinde
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
nagpur winter session, Eknath shinde, uddhav thackeray
नागपूर : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी… “
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray shivsena
Deepak Kesarkar : “…तर शिवसेनेचे दोन भाग झालेच नसते”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा…‘दारू’वरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले, चंद्रपुरात नेमके काय घडले? वाचा…

नाराजी व मनधरणी नाट्य

या पार्श्वभूमीवर काल शनिवारी संध्याकाळी, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश मानटे, आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्यातील शिंदेंचे निवासस्थान गाठले. त्यांची दोन तास बंद द्वार बैठक झाली. याचदरम्यान बावनकुळे यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चे अंती महाले, मानटे व शिंदेंना नागपुरात पाचारण करण्यात आले. त्यानुसार शिंदे आज नागपुरात दाखल झाले. दरम्यान मध्यान्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी त्यांना संपर्क केला. त्यांनी सहकार्य करण्याचे सांगितले असता विजयराज शिंदेंनी शिंदे गटाच्या वागणूक व विधानाची माहिती दिली. आपण बावनकुळे यांच्या भेटीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून भाजप संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन आज सकाळी अकरा च्या सुमारास बुलढाण्यात दाखल झाले. मात्र शिंदे नागपुरात असल्याचे समजताच त्यांनी फोनवरून चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. नंतर ते परभणी कडे रवाना झाल्याचे समजते.

हेही वाचा…“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”

‘औकात’ मुळे संघर्ष वाढला

दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या दिवशी, २ तारखेला माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे गुलाब पाटील यांनी, शिंदेंची औकात काय? असा सवाल केला होता. आमदार गायकवाड यांनी, शिंदे यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी असे आव्हान केले होते.त्यामुळे वाद चिघळला. शिंदेंनी लढण्याचा निर्धार करून प्रचार सुरू केला.

Story img Loader