लोकसत्ता टीम

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वाशीम मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले. त्यांच्या जागी भाजपने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली आहे. वाशीम मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना होणार आहे.

Raju Todsam, Kisan Wankhede
आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Nagpur West constituency, Sudhakar Kohle,
पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध आता दक्षिणचे पुन्हा ‘सुधाकर’

वाशीम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे भाजप आमदार लखन मलिक प्रतिनिधित्व करीत होते. २००९ पासून सलग तिनदा ते निवडून आले आहेत. त्यापूर्वी १९९० मध्ये देखील ते विजयी झाले होते. वाशीम जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार असतांना पक्षाने त्यांच्यावर आता विश्वास दाखवला नाही. मलिक यांच्यावर निष्क्रियतेची टीका सातत्याने झाली. वाशीममध्ये पक्षांतर्गत देखील त्यांच्या विषयी तीव्र नाराजी होती. त्यामुळे लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपमध्ये वाशीम मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. अनेक जण इच्छूक होते. अखेर पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांच्या गळ्यात भाजपने उमेदवारीची माळ टाकली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वाशीममध्ये भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा-राजुरा भोंगळे, ब्रह्मपुरी सहारे, तर वरोऱ्यात देवतळेंना उमेदवारी

वाशीम मतदारसंघातून मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट लढत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवबंधन बांधलेल्या डॉ. सिद्धार्थ देवळे यांना शिवसेनेने वाशीम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. हृदय रोग तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून याच मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपला जोरदार लढत देत दुसऱ्या क्रमांकाची ५२ हजार ४६४ मते मिळवली होती. आता वाशीम मतदारसंघात भाजपचे श्याम खोडे विरूद्ध शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यात लढत होणार आहे.

आणखी वाचा-भाजपकडून जुन्यांनाच संधी; अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी

रिसोड व कारंजाच्या उमेदवारांची प्रतीक्षा

जिल्ह्यातील रिसोड व कारंजा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांची प्रतीक्षा लागली आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. रिसोड मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने देखील दावा केला आहे. पक्ष नेतृत्व काय निर्णय घेतो, याकडे दोन्ही मतदारसंघातील सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघ भाजपच लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.