वर्धा : एखाद्या इच्छापूर्तीसाठी आपली श्रद्धा असलेल्या देवास पूजण्याची भारतीय परंपरा नवी नाही. राजकारणी तर ही परंपरा हमखास पाळत असल्याचे आजूबाजूला दिसून येते. त्यात भाजप नेते सर्वात आघाडीवर असल्याचे हमखास दिसते. निवडणूक जवळ आली की या तमाम नेत्यांच्या पूजा विधिला जणू उधाणच येते.

खासदार रामदास तडस हे तर नेता होण्यापूर्वी कसलेले मल्ल म्हणून सुदूर परिचित होते. त्यामुळे मारोतीची आराधना ओघाने आलीच. ते नित्यनेमाने देवळीलगत असलेल्या एकपाळा येथील मारोतीची पूजा करीत असतात. यावेळी त्यांची लोकसभेची तिकीट भाजप कापणार, या चर्चेने जोर पकडला होता. त्यांना मानणारे या चर्चेने व्याकुळ झाले होते. मात्र स्वतः तडस हे तिकीट मिळण्याबाबत आश्वस्त होते. तरी कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी एकपाळा येथे महाप्रसाद आयोजित केला.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Nagpur winter session will be held from December 16th to 21st and it will be formality
नागपूर हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे ? वैदर्भीय नाराज

हेही वाचा…वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

मंगळवारी खासदार हे पत्नी व मुलासह मारोतीराया कडे दाखल झाले. यज्ञ, शंखनाद, होम हवन, सामूहिक आरती तसेच साग्रसंगीत पूजा आरती झाली. महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला. सर्व कृतार्थ भावनेने घरी आले. दुसऱ्या दिवशी खासदार नेहमीप्रमाणे दौऱ्यावर निघाले. आणि दुपारीच तिकीट पक्के झाल्याचे त्यांना समजले. सायंकाळी अधिकृत घोषणा झाली. आणि त्यांच्या कार्यालयात, बजरंग बली की जय, या गर्जनेचा गजर झाला.

हेही वाचा…“चंद्रपूर लोकसभेची जागा तेली समाजाला सोडावी”, कोणी केली मागणी? जाणून घ्या

मारोती पावला का, या प्रश्नावर खासदार तडस हसत म्हणाले की तो मला नेहमीच पावतो. वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी एकपाळा येथे दर्शना साठी जात आहे. त्याच्याच आशीर्वादाने अनेक कुस्त्या जिंकल्या. पुढे पालिका राजकारणात या मारुतीचा आशीर्वाद घेऊन यशस्वी झालो. विधान परिषदेच्या दोन निवडणुका जिंकलो. पुढे खासदार झालो. कोणतेही काम सूरू करण्यापूर्वी मी एकपाळा येथे दर्शन घेतो. त्यामुळे यश मिळते, अशी माझी श्रद्धा असल्याचे तडस म्हणतात. सुरुवातीस साध्या स्वरूपात असलेल्या या मंदिरास आता वैभव प्राप्त झाले आहे. सभागृह व अन्य सोयी झाल्या. भक्तही कृतज्ञ् भावनेने सेवा देतात. खासदार तडस त्यात अग्रभागी असतात.

Story img Loader