नागपूर: लोकसभा आणि विधानसभा निवडणुक च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक अत्रे ले आऊट येथील मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आमदाराच्या वेगवेगळ्या बैठक होत असून पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील आमदाराची बैठक आटोपली असून दुपारी पश्चिम विदर्भाची बैठक सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहा विदर्भातील सर्व आमदार सहभागी झाले आहे. तर संघाकडून प्रांत कार्यवाह अतुल मोघे. क्षेत्र कार्यकारीणी सदस्य दीपक तामशेट्टीवार . विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरें. महानगर संघचालक राजेश लोया या बैठकीला उपस्थित आहेत.आगामी निवडणुक आणि संघटन बांधणी. हिंदुत्व आदी विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे.