नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांच्या हत्याकांडाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकाही भाजप नेत्याने सना यांना श्रद्धांजली वाहिली नाही किंवा सना यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलीस आयुक्तांना साधे निवेदनही दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सना खान या भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या आणि मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या फेसबुकवर अनेकांची छायाचित्रे आजही झळकत आहेत. मात्र, यातला कुणीही या विषयावर एक शब्दही न बोलल्याने या हत्याकांडाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सना यांनी पूर्वी भाजपच्या युवा मोर्चातसुद्धा काम केले आहे. विद्यार्थी जीवनापासूनच सना भाजपमध्ये सक्रिय होत्या.

हेही वाचा… ‘…तर मंत्रालयात विष प्राशन करू’, अंबुजा प्रकल्पग्रस्तांचा शासनाला निर्वाणीचा इशारा

त्यांनी करोना काळात अन्नदान, धान्य किट वाटप आणि रक्तदान कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे सना या जरीपटका परिसरात दीदी नावाने परिचित होत्या. सना यांच्या याच कामाची दखल भाजप श्रेष्ठींनी घेतली होती. सना अल्पावधीतच भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात आल्या. सना यांना महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील नेतेही कार्यक्रमांना बोलवायला लागले.

हेही वाचा… नागपूर : स्पीड पोस्ट सेवा ठप्प, राख्या भावाकडे पोहोचल्याच नाहीत

वतृत्वशैलीमुळे सना भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत सभा घ्यायला लागल्या. काही नेत्यांनी सना यांच्या कार्यशैलीचा आपल्या प्रचारासाठी किंवा स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापर करून घेतला. सामाजिक कार्याच्या चित्रफिती बनवण्याची आणि छायाचित्र काढण्याची सवय असलेल्या सना यांनी भाजपच्या अनेक नेत्यांसोबतच्या उपक्रमांना चित्रबद्ध केले. ते फेसबुकवर प्रसिद्ध केले. त्यात भाजपच्या नागपूर शहराध्यक्षांपासून ते युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची छायाचित्रे आहेत. तसेच भाजपच्या काही जेष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांसोबतही सना यांची छायाचित्रे आहेत.

हेही वाचा… रेल्वेने नागपूर-शहडोल नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय का फिरवला?

सना खान या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. परंतु, या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप होऊ नये, या हेतूने आणि पोलीस निष्पक्ष तपास करीत असल्याने आतापर्यंत भाजपच्यावतीने कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. आमच्या पूर्ण संवेदना सना खान यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल आणि खान कुटुंबीयांना न्याय मिळेल. – चंदन गोस्वामी, प्रवक्ते,भाजप

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp silence on sana khan murder case adk 83 asj