नागपूर : उद्धव ठाकरे जितकी खालची पातळी गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील, त्यापेक्षा जास्त खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यासाठी माझ्याजवळ पुरावे आहेत. ३९ वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने त्यांची संपूर्ण कुंडली आम्हाला माहिती आहे. त्यांना दिवसाही तारे दाखवण्याची आमची तयारी आहे, अशी आव्हानवजा टीका भाजपाचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा >>> “…अन्यथा तेली समाजाचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा
नितेश राणे नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. गेल्या अडीच वर्षातील सरकार हे पाटणकर सरकार होते. ते उद्धव ठाकरेंचे नव्हते. ज्या दिवशी पाटणकर काढा निघेल, त्या दिवशी ते मातोश्रीच्या बाहेर पडणार नाही. त्यांनी त्यावेळी एवढी काळजी स्वतःच्या आमदारांची घेतली असती तर ही वेळ आली नसती. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बीनबुडाचे आरोप करत असेल तर त्यांचे रोज कपडे फाडू शकतो, एवढी माहिती आमच्याकडे असल्याचे राणे म्हणाले.
हेही वाचा >>> ठरले! ‘या’ तारखेला स्पर्धा परीक्षा समिती सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार… ‘या’ आहेत प्रमुख मागण्या
रोहित पवार हे सिनियर केजीत आहे. अजून ते शाळेत पोहचले नाही, त्यांना मिशा आणि कंठ अजून फुटलेला नाही. आताच ते अंड्याच्या बाहेर पडलेले आहे. त्यांनी राजकारणाचा अनुभव घ्यावा, अशी उपरोधीक टीका करत प्रणिती शिंदे काय बोलल्या त्यावर त्यांनी लक्ष घालावे. त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा आणि असे काही विचित्र वक्तव्य करण्यापेक्षा थोडे कर्जतमध्ये लक्ष घालावे. जेणेकरून माजी आमदार ही पाटी लावण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असेही राणे म्हणाले.
ओबीसी व मराठा समाजाला सरकार न्याय देईल. हिंसक आंदोलनाच्या मागे जेष्ठ पत्रकार संजय राऊत आणि त्यांचे लोक आहेत. याचे पुरावे लवकर बाहेर येतील, असेही राणे म्हणाले.