वर्धा : स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेससोबत मिळून लढण्यास नकार. मात्र, पक्षश्रेष्ठी म्हणतात, वाट्टेल तसे मैदानात उतरा. चिन्हाचा प्रश्नच नाही. हिंगणघाट बाजार समितीची निवडणूक अभद्र तडजोडीने गाजत आहे. प्रामुख्याने काँग्रसचे आमदार रणजीत कांबळे व भाजपाचे आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली आघाडी चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज हमरीतुमरीवर उतरले असल्याने हा मित्रभाव सर्वांना आश्चर्यात टाकणारा ठरत आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत ही निवडणूक लढण्यास विरोध केला होता. प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेले. तेव्हा ज्येष्ठांनी, ही निवडणूक पक्ष चिन्हावर होत नाही, त्यामुळे कुणावर यांना वाटते तसे करू द्या व तुम्हास स्वतंत्र लढायचे असेल तर तसे लढा, असा तोडगा काढला.

हेही वाचा – गडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण! ‘मनरेगा’तील गैरव्यवहारामुळे इतरही विभाग चर्चेत

हेही वाचा – विषयनिहाय आरक्षणाने प्राध्यापक भरती ; संवर्गनिहाय आरक्षण लागू होण्यापूर्वीची पदे जुन्या पद्धतीनेच भरणार

रविवारी आ. कांबळे व आ. कुनावार यांनी प्रचाराचा एकत्र नारळ फोडला तर निष्ठावंत ‘एकला चलो रे’ म्हणून लढत आहे. संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले की, यात पक्षाचा संबंध येत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे.