महाविकास आघाडीची छ.संभाजीनगर येथे रविवारी झालेली सभा ही शिल्लक सेनेची बोंबाबोंब सभा होती, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. सभेच्या मंचावर बसलेले सर्व नेते हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी काहीच केले नाही. ४० हजार कोटीच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत खोळंबा घातला. मराठवाडा वैधानिक मंडळाचे पुनर्गठन केले नाही. त्यावेळी अजित पवार काय म्हणाले होते ते महाराष्ट्राला माहिती आहे.

हेही वाचा >>> धामणगाव बढे येथे शिंदे सेनेला खिंडार, माजी सरपंचासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

संभाजीनगर नामकरणाचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला, तो मोदीजींच्या सरकारने मान्य केला. असे बावनकुळे म्हणाले. अशोक चव्हाण भाजपात येणार का? या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले, येत्या काळात अनेक नेते भाजपात येणार आहेत. त्त्यात पुण्यातील ठाकरे गटातील काही नेत्यांचा समावेश असेल.. दंगली घडविणे हा आमचा स्वभाव नाही त्याची गरजही आम्हाला नाही, ही केवळ बोंबाबोंब आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader