राज्यात शिंदे-फडणवीस जोडी ही धनाजी- संताजीची जोडी असून दोघेही दमदार काम करत आहे. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या उद्धव ठाकरे यांनी आम्हाला काही सांगू नये अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video : वृद्ध कलावंतांनी काढली ‘समाजकल्याण’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिंदे- फडणवीस सरकार राज्यात सत्ता आल्यानंतर सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत काम करत आहे तसे आमच्यावर संस्कार आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने  मदत करणार आहे. आजपर्यतच्या इतिहासात सर्वात चांगला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांचे चेहरे छोटे झाले होते. त्यांना आता पश्चाताप होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : तरूणींची छेड काढणारा ‘मजनू’ थेट कोठडीत

उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्पावर तर बोलू नये. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सल्ला न देता त्यांनी जे सोबत आहे त्यांना कसे टिकवून ठेवता येईल त्याबाबत विचार करावा विदर्भातील क्रीडा मंत्री असताना निधी मिळत नव्हता आता शंभर कोटी रुपये विभागीय क्रीडा संकुलला मिळाले असे सांगत त्यांनी माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी काय निंर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार पण त्यांच्या सोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state chief chandrashekhar bawankule praise shinde fadnavis for doing good work together vmb 67 zws